

सावंतवाडी । प्रतिनिधी : सोमवारी दुपारी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे तळवडे म्हाळईवाडी येथील गुरुनाथ चंद्रकांत नागवेकर यांच्या घराचे पत्रे उडाले. तुटलेले पत्रे घरात कोसळले त्यामुळे घरातील वस्तूंचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सुदैवाने यावेळी कोणीही घरात नसल्यामुळे दुर्घटना घडली नाही. मात्र, पत्रे उडाल्याने पावसाचे पाणी घरात शिरल्यामुळे धान्य व इतर वस्तूंचे नुकसान झाले. या प्रकारामूळे त्यांचे सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.












