संकेत घाग यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे प्रभानवल्ली पं.स.गणातील निवडणूक होणार रंगतदार व लक्षवेधी

लांजा (प्रतिनिधी): तालुक्याच्या पूर्व भागातील प्रभानवल्ली पंचायत समिती गणातून भाजपाचे कार्यकर्ते संकेत घाग यांनी दाखल केलेल्या अपक्ष उमेदवारीमुळे प्रस्थापित राजकीय पक्षांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे .
प्रभानवल्ली पंचायत समिती गणाची यावेळची निवडणूक ही अतिशय रंगतदार आणि चुरशीची तसेच लक्षवेधी ठरणार आहे. या पंचायत समिती गणातून शिवसेना पक्षाकडून उमेश पत्की, शिवसेना ठाकरे पक्षाकडून राजेंद्र घडशी तर बसपा कडून आनंदा कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.‌ मात्र सुरुवातीला दुरंगी वाटणारी लढत आता विशेष लक्षवेधी ठरणार आहे ती संकेत घाग यांनी भरलेल्या अपक्ष उमेदवारीमुळे.‌
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच भाजपाचे पदाधिकारी असलेले संकेत घाग यांनी प्रभानवल्ली पंचायत समिती गणातील विविध विकास कामे स्वखर्चाने मार्गी लावली होती. त्यामुळे साहजिकच लोकांचा त्यांच्याकडे असलेला ओढा वाढलेला आहे आणि यातूनच त्यांनी आपले संपर्क कार्यालय देखील सुरू केले होते.
आता सर्वच राजकीय पक्षांनी या ठिकाणी पंचायत समिती गणावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले असताना संकेत घाग यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे या सर्वच राजकीय पक्षांसमोर मोठे आव्हान उभे टाकले आहे. त्यामुळे पंचायत समिती निवडणुकीमध्ये प्रभानवल्ली गणाची निवडणूक ही लक्षवेधी ठरणार आहे.