जिल्हाधिकारी अमोल येडगे व पोलीस अधिक्षक योगेश गुप्ता यांचे मार्गदर्शन
प्रतिनिधी/ रोहन कांबळे
कोल्हापूर: २५ जानेवारी हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. याच दिवशी २५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. स्वतंत्र भारताने लोकशाहीची वाट स्वीकारल्यानंतर, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपवण्यात आली. त्यामुळे भारतीय लोकशाहीत २५ जानेवारी या दिवसाला अतिशय महत्व आहे. तथापि, नागरिकांना आपल्या मताची किंमत उपयोगिता, महत्व आणि कर्तव्य कळावे यासाठी २५ जानेवारी २०११ पासून हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा होतो. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार दिवस कार्यक्रम पार पडला.जिल्हाधिकारी अमोल येडगे व पोलीस अधिक्षक योगेश गुप्ता यांनी मतदानाचे महत्व समजावून सांगितले.या कार्यक्रमात मतदार जनजागृतीकामी लोकशाही अधिक बळकट होण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करणे, तरुण मतदारांचा सहभाग वाढवणे, सुजाण, स्वतंत्र आणि निष्पक्ष मतदानाचे महत्व मतदारांना समजावून सांगण्यात आले.मतदान हा प्रत्येक नागरिकांचा मूलभूत हक्क व कर्तव्य आहे .ही नागरिकांमध्ये कर्तव्याची जाणीव निर्माण करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
अमोल येडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसह मतदानाची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.
या कार्यक्रम सोहळ्यात तृतीयपंथी घटकाचे मयुरी आळवेकर यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमात आम्हाला सामील करून घेतल्या बद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलिस अधीक्षक योगेश गुप्ता यांचे मयुरी आळवेकर यांनी आभार मानले.या कार्यक्रमास जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्यासह प्रशासनातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.













