प्रतिनिधी | श्रीरंग सावंत
सावंतवाडी : तांबुळी प्रिमियर लीग (TPL) पर्व ७वे अंतर्गत आयोजित करण्यात आलेली २४ व २५ जानेवारी २०२६ रोजीची दोन दिवशीय भव्य क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात, खेळाडूवृत्तीच्या भावनेत आणि आनंदी वातावरणात पार पडली. या स्पर्धेत गावातील विविध संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपले क्रिकेट कौशल्य सादर केले.
स्पर्धेच्या दोन्ही दिवशी खेळविण्यात आलेल्या सामन्यांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. आक्रमक फलंदाजी, अचूक गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणामुळे प्रत्येक सामना रंगतदार ठरला. अंतिम सामना शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक ठरला असून प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात खेळाडूंना दाद दिली.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे गावातील सर्व स्तरातील लोकांचा सक्रिय सहभाग. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतला. विशेषतः गावातील युवक व मुलांनी मैदान व्यवस्थापन, शिस्त, पाहुण्यांचे स्वागत अत्यंत जबाबदारीने पार पाडले. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानामुळे स्पर्धा अधिक शिस्तबद्ध व यशस्वी ठरली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक समितीने केलेल्या उत्कृष्ट नियोजनाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. समारोप समारंभात विजेत्या व उपविजेत्या संघांना आकर्षक चषक व पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
शिव साई 11 संघाचे संघ मालक श्री शिवराज सावंत व संघातील खेळाडू हे उत्कृष्ट खेळी करत तांबोळी प्रीमियर लीग 2026 चे मानकरी ठरले. त्याचप्रमाणे विनू वॉरियर्स संघाचे संघ मालक महेश तांबुलकर व संघातील खेळाडूनी देखील उत्कृष्ट खेळी करत तांबोळी प्रीमियर लीग 2026 चे द्वितीय मानकरी ठरले
त्याचप्रमाणे
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक : विशाल सावंत
उत्कृष्ट गोलंदाज : ओमकार भोसले
उत्कृष्ट एसटी रक्षक : कल्पेश ( बंटी ) सावंत
मालिकावीर : हर्ष परब आणि गणपत सावंत
उद्योनमुख खेळाडू : श्रेयस सावंत
या सर्व खेळाडूंनी हे पुरस्कार मिळवले
तांबुळी प्रिमियर लीग पर्व ७वे या क्रिकेट स्पर्धेमुळे तांबुळी गावात क्रीडामय, एकोप्याचे व उत्साही वातावरण निर्माण झाले. युवकांमध्ये क्रिकेटविषयीची आवड अधिक वाढली असून गावातील सामाजिक सलोखा आणि संघभावना अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले. ही दोन दिवशीय क्रिकेट स्पर्धा अत्यंत यशस्वीरीत्या, आनंदात व संस्मरणीय ठरली.
















