मालवणात भाजप महायुतीच्या सीमा परुळेकर बिनविरोध

आडवली मालडी पंचायत समिती मतदार संघातून उबाठा उमेदवराची अखेरच्या क्षणी माघार

मालवण | प्रतिनिधी : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत मालवण तालुक्यात महायुती माध्यमातून आडवली मालडी पंचायत समिती मतदार संघातून भाजप उमेदवार तथा माजी सभापती सीमा सतीश परुळेकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत. ठाकरे शिवसेना उमेदवार रोहिणी अरुण राऊत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने परुळेकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत.