मसुरे | झुंजार पेडणेकर : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत राठीवडे येथे नाचणी व वरई पिकावरील आधारित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचे शास्त्रज्ञ श्री सुयश राणे, राठीवडे सरपंच श्रीम दिव्या धुरी, मंडळ कृषी अधिकारी पोईप श्री दशरथ सावंत, उपकृषि अधिकारी पोईप श्रीपाद चव्हाण, राठीवडे उपसरपंच श्री निखिल जाधव, ग्रा. प.सदस्य श्री बाळा धुरी ,श्री यशवंत राऊत, सहाय्यक कृषी अधिकारी श्रीम स्नेहल जिकमडे, ग्रामपंचायत अधिकारी श्री विनोद रावले, पोलीस पाटील श्री. संदेश धुरी तसेच वरई व नाचणी पीक प्रात्यक्षिकासाठी निवड करण्यात आलेले शेतकरी व इतर शेतकरी उपस्थित होते. यावेळी श्री सुयश राणे यांनी यांत्रिकीकरण विषयी मार्गदर्शन केले. उपकृषि अधिकारी श्री श्रीपाद चव्हाण यांनी कीड रोग व्यवस्थापन व कृषि समृद्धी योजना याविषयी मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे महाविस्तार AI अँप विषयी देखील शेतकऱ्यांना देण्यात आली. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचे तालुका संसाधन व्यक्ती श्री कृष्णा साळसकर यांनी PMFME योजनेविषयी माहिती दिली. हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरला असून भविष्यातही अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज असल्याचे मनोगत राठीवडे सरपंच श्रीम दिव्या धुरी यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कृषि अधिकारी, असगणी श्रीम स्नेहल जिकमडे यांनी केले.













