बहुतांश गट व गणांमध्ये दुरंगी व तिरंगी लढत
राजापूर| प्रतिनिधी: राजापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पांयत समिती निवडणुकीकरीता मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी पंचायत समिताच्या १२ गणातून १६ उमेदवारांनी तर जिल्हा परिषदाच्या ६ गटातून चार उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. जुवाठी जि. प. गटातुन दिपक बेंद्रे यांनी तर धोपेश्वर पंचायत समीती गणातुन अरवींद लांजेकर यांनी आमदार निलेश राणे व आमदार किरण सामंत यांच्या विनंतीला मान देत आपले अर्ज मागे घेतले आहेत.
राजापूर तालुक्यात वडदहसोळ, जुवाठी, धोपेश्वर, साखरीनाटे व कातळी या सहा जिल्हापरिषद गट व वडदहसोळ, रायपाटण, तळवडे, ताम्हाणे, केळवली, जुवाठी, धोपेश्वर, पेंडखळे, नाटे, साखरीनाटे, अणसुरे व कातळी या बारा पंचायत समिती गणाकरीता निवडणूक होत आहे. या निवडणुकीकरीता जिल्हा परिषदाया सहा गटांसाठी १९ तर पांयत समिताया १२ जागांसाठी ५२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. या अर्जांची छाननी होवून जिल्हा परिषद गणातील १७ अर्ज वैध तर पंचायत समिती गणातील ४९ अर्ज वैध ठरविण्यात आले होते.
दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्हा परिषद वडदहसोळ गटातून संदिप कोलते, जुवाठी गटातून दिपक बेंद्रे, अनाजी गोटम तर साखरीनाटे गटातून श्वेता कोठारकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता वडदहसोळ जिल्हापरिषद गटातून राजेश चव्हाण (शिवसेना ठाकरेगट), प्रतीक मटकर (शिवसेना), तळवडे गटातून समिक्षा चव्हाण (शिवसेना ठाकरेगट), सिध्दाली मोरे (शिवसेना), जुवाठी गटातून दिनेश जैतापकर (शिवसेना ठाकरेगट), रमेश सूद (शिवसेना), धोपेश्वर गणातून पकाश कुवळेकर (शिवसेना), अभिजीत तेली (शिवसेना ठाकरेगट), साखरीनाटे गटातून कोमल नवाळे (शिवसेना), नलिनी शेलार (शिवसेना ठाकरेगट), कातळी गटातून सोनाली ठुकरूल (शिवसेना), लक्ष्मी शिवलकर (शिवसेना ठाकरेगट), सावित्री कणेरी (अपक्ष) यांच्यामध्ये लढत होणार आहे.
तालुक्यातील १२ पंचायत समिती गणातून तब्बल १७ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामध्ये वडदहसोळ – सुनिल म्हादये, अनिल गुरव, रायपाटण – शंकर पटकारे, संदिप कोलते, तळवडे – स्नेहा नारकर, ताम्हाणे – मधुरा सुतार, केळवली – वैष्णवी कुळये, पभावती कानडे, धोपेश्वर – अरविंद लांजेकर, विलास गुरव, पेंडखळे – सुनिल जठार, प्रफुल्ल सुर्वे, साखरीनाटे – आश्विनी शेगुलकर, कातळी – अक्षयकुमार कार्शिंगकर, सुहास कुवरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
त्यामुळे आता वडदहसोळ गणातून विनोद शिंदे (शिवसेना ठाकरेगट), राजेश पवार (मनसे), गौतम जाधव (शिवसेना), रायपाटण गणातून उमेश पराडकर (शिवसेना), विश्वनाथ लाड (शिवसेना ठाकरेगट), तळवडे गटातून भामिनी सुतार (शिवसेना ठाकरेगट), अपेक्षा मासये (शिवसेना), ताम्हाणे गणातून समिक्षा वाफेलकर (शिवसेना), योगी डांगे (शिवसेना ठाकरेगट), केळवली गणातून भाग्यश्री लाड (शिवसेना), छाया कोकाटे (शिवसेना ठाकरेगट), जुवाठी गणातून पकाश भिवंदे (अपक्ष), दिवाकर मयेकर (शिवसेना ठाकरेगट), पसाद मोहरकर (शिवसेना), धोपेश्वर गणातून अभिजीत गुरव (भाजपा), कृष्णाजी नागरेकर (शिवसेना ठाकरेगट), सिध्देश मराठे (काँग्रेस), योगेश नकाशे (अपक्ष), पेंडखळे गणातून राजेश गुरव (शिवसेना), गणेश बाईंग (शिवसेना ठाकरेगट), पणाली माळी (अपक्ष), नाटे गणातून सुवर्णा बांदकर (भाजपा), नमिता नागले (शिवसेना ठाकरेगट), नंदिनी कदम (अपक्ष), साखरीनाटे गणातून अलमिनाब म्हसकर (काँग्रेस), स्पृहा गुरव (शिवसेना), अणसुरे गणातून दिपाली मेढेकर (शिवसेना ठाकरेगट), जान्हवी गावकर (शिवसेना), सावित्री कणेरी (अपक्ष), कातळी गणातून पंढरीनाथ मयेकर (शिवसेना), अजय कार्शिंगकर (शिवसेना ठाकरेगट), बाळकृष्ण हळदणकर (अपक्ष) यांयामध्ये लढत होणार आहे.
दरम्यान राजापूर तालुक्यात शिवसेना शिंदे गट व भाजपामध्ये बंडखोरी झाल्याचे पहायला मिळाले होते. या बंडखोरांची मनधरणी करण्याचे मोठे आव्हान महायुतीसमोर होते. त्यानुसार बंडखोरांना शांत करण्यात महायुतीला काहीअंशी यश आले असले तरी धोपेश्वर आणि जुवाठी गटातील बंडखोरी शमविण्यात दोन्ही पक्षांना यश आले नसल्यो पहायला मिळत आहे.












