कामावर असतानाच काळाचा घाला; राजस्थानच्या वृद्ध कामगाराचा रत्नागिरीत मृत्यू

रत्नागिरी ः प्रतिनिधी
रस्त्यावर पेंटिंगचे काम करण्यासाठी परराज्यातून आलेल्या 60 वर्षीय कामगाराचा काम करताना आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना शनिवार 24 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वा.सुमारास घडली.
प्रताप मवाशी सिंग (60,मुळ रा.महचौली,ता.पिपला जि.भरतपूर,राजस्थान) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. प्रताप सिंग हा ईगल कंपनीमार्फत रस्त्यावर पेंटिंगचे काम करण्यासाठी आला होता. शनिवारी सकाळी त्याला अस्वस्थ वाटून छातीत दुखू लागल्याने त्याला उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालय पाली येथे दाखल करण्यात आले होते. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.