गुहागर प्रतिनिधी
सर्वसामान्य जनतेसाठी काम करण्याची तळमळ व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी तळवली पंचायत समिती गणातून भाजपकडून मंगेश जोशी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळेच मंगेश जोशी यांना तळवली पंचायत समिती गणातून मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.
मंगेश जोशी हे भाजपचे जुने पदाधिकारी आहेत.तसेच माजी आम.डॉ.विनय नातू यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. डॉ. विनय नातू यांच्या आमदारकीच्या काळात त्यांच्या प्रचाराची व कामकाजाची धुरा त्यांनी अनेक वेळा यशस्वीपणे पार पाडली आहे. मंगेश जोशी यांना तळवली पंचायत समिती गणातून सध्या वाढता पाठिंबा मिळत असून सर्वसामान्य जनतेसाठी आहोरात्र झोकून काम करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.
कारूळ सारख्या ग्रामीण भागातून त्यांनी एक यशस्वी पर्यटन व्यवसाय उभारला आहे.या पर्यटनाच्या माध्यमातून त्यांनी गावातील अनेक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.तसेच कारूळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी त्यांनी स्वतः तसेच त्यांच्या पत्नी यांनी देखील यशस्वी कारभार केला आहे. तळवली पंचक्रोशीत त्यांचा चांगला जनसंपर्क असून तळवली पंचायत समिती गणातून त्यांना मतदारांचा दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे.













