न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
फोंडाघाट /कुमार नाडकर्णी— न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट प्रशालेमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास इयत्ता पाचवी ते बारावीचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहन शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रसाद पारकर यांच्या हस्ते करण्यात आले. एकतेचे महत्व दाखविणारी संगीतमय कवायत उत्साहात पार पडली. एनसीसी कॅडेट्सचे संचलन डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. त्यानंतर साक्षरता अभियान व कॉपीमुक्त अभियानाची शपथ सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी घेतली.
कार्यक्रमानंतर इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत परिसर देशभक्तीमय केला.
त्यानंतर सर्व विद्यार्थी व शिक्षक केंद्र शाळा फोंडाघाट येथे सार्वजनिक ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. येथे विद्यार्थ्यांचे विविध देशभक्तीपर कार्यक्रम सादर करण्यात आले. आकाशगंगा या सामूहिक नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली.एनसीसी कॅडेट्सनी केलेला डेमो नजर खिळवून ठेवणारा होता.या कार्यक्रमास सरपंच सौ संचना आग्रे,उपसरपंच तनवी मोदी, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गावातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











