राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आज शोकसभेचे आयोजन

दापोली | प्रतिनिधी:- राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख अजितदादा पवार यांचे दुःखद निधन हे केवळ एका नेत्याचे जाणे नसून, राज्याच्या राजकारणात आणि सामान्य जनतेच्या हृदयात निर्माण झालेली न भरून येणारी पोकळी आहे. आपल्या स्पष्टवक्तेपणा, कठोर निर्णयक्षमता आणि जनतेशी असलेली थेट नाळ यामुळे त्यांनी राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली. कार्यकर्ता, शेतकरी, युवक, महिला अशा प्रत्येक घटकासाठी ते कायम मार्गदर्शक आणि आधारस्तंभ राहिले. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व पक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोकसभा फाटक कैपिटल दापोली येथे आज दि २९ /१/२०२६ रोजी .४ ०० वाजता संपन्न होणार आहे.

या शोकसभेत सहभागी होऊन अजित दादांच्या कार्याला, विचारांना आणि जनतेसाठी दिलेल्या योगदानाला कृतज्ञतेने स्मरण करणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. तरी सर्व मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक व मायबाप जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून अजित दादांना श्रद्धांजली अर्पण करावी असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष श्री जयवंत जालगावकर यांनी केली आहे.