देवगड / प्रतिनिधी
फ्रेंडस् सर्कल- देवगड सडा यांच्यावतीने राधाकृष्ण रिट्रीट येथे नुकत्याच पार पडलेल्या भव्य कॅरम स्पर्धेत एकेरी गटात विकास कुळकर्णी यांनी, तर दुहेरी गटात योगेश कोळी व मेषक राणे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेचे उद्घाटन फ्रेंडस् सर्कल मंडळाचे ज्येष्ठ सभासद प्रवीण नळेकर व किरण कुर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. स्पर्धेत ४८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे हे २७ वे वर्ष होते.
स्पर्धेतील एकेरी गटात द्वितीय क्रमांक- योगेश कोळी, तृतीय क्रमांक- संदीप राणे, चतुर्थ क्रमांक- हेमंत गाडगीळ यांनी मिळविला. तर दुहेरी गटात द्वितीय क्रमांक- संदीप राणे व चंदन दळवी, तृतीय क्रमांक- शुभम पेडणेकर व संकेत कदम, चतुर्थ क्रमांक हेमंत गाडगीळ व प्रकाश प्रभू यांनी मिळविला. एकेरी गटातील प्रथम क्रमांकास रोख ३,००१ रू., द्वितीय क्रमांकास २,००१ रू., तृतीय व चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी ५०१ रू. चे बक्षीस देण्यात आले. तर दुहेरी गटातील प्रथम क्रमांकास ६००१ रु., द्वितीय क्रमांकास ४,००१ रू., तृतीय व चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी १,००१ रू. चे बक्षीस देण्यात आले. बक्षीस वितरणप्रसंगी शेखर सावंत, नितीन सावंत, प्रशांत मालाडकर, प्रकाश पटेल, शेखर कुबल, प्रवीण सावंत, राजेश तारी, सुमित बांदेकर, सुमित कुबल आदी उपस्थित होते. देवगड कॅरम असोसिएशनच्या सभासदांनी स्पर्धेचे नियोजन केले होते. स्पर्धा आयोजनात राधाकृष्ण रिट्रीटचे सुमित कुबल यांचे विशेष सहकार्य लाभले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी फ्रेंडस् सर्कलच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.













