नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
प्रतिनिधी/ रोहन कांबळे
राधानगरी: तालुक्यातील ठिकपुर्ली येथे दि.१० ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा ते ११ऑगस्ट पहाटे सहा वाजेपर्यंत धाडसी चोरी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन भिउंगडे यांचे भोगावती-शेळेवाडी मार्गावर रस्त्या लगत घर आहे.रात्री सगळे झोपी गेल्यानंतर रात्री ११ च्या दरम्यान चोरट्यांनी बंद घराचे खिडकीचे गज कट करून घरात प्रवेश करून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह दीड लाख रुपये असा सुमारे ६ लाख रुपयांवर डल्ला मारला.
घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. राधानगरी पोलिस पुढील तपास करत आहेत.











