कणकवली:- बॅ. नाथ पै यांच्या निर्भिड, प्रभावी आणि लोकशाही मूल्यांनी नटलेल्या व्यक्तिमत्त्वावर आधारित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, वरवडे येथील इयत्ता ९ वीचा विद्यार्थी कु. तनय सिद्धेश नातू याने उत्तेजनार्थ क्रमांक मिळवून शाळेच्या यशात मानाचा शिरपेच रोवला आहे.
उत्कृष्ट संसदपटू, प्रभावी वक्ता आणि निर्भीड नेतृत्वाचे प्रतीक असलेल्या बॅ. नाथ पै यांच्या जीवनकार्यावर आधारित विषयावर कु. तनय नातू याने सुस्पष्ट मांडणी, प्रभावी शब्दप्रयोग आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण करून परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत सर, कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल सर, सचिव प्रा. हरिभाऊ भिसे सर, सहसचिव प्रा. निलेश महिंद्रकर, खजिनदार सौ. शीतल सावंत मॅडम, सल्लागार डी. पी. तानावडे सर, मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकवर्गाने कु. तनय नातू याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.












