धोकादाय साईडपट्टी दुरूस्त करावी

उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांनी वेधले सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष

मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद समोरील मालवण-कसाल या मुख्य रस्त्याची साईड पट्टी अत्यंत धोकादायक बनली आहे. तरी

धोकादाय साईडपट्टी दुरूस्त करावी. अशी मागणी मालवण नगरपरिषद उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण यांच्याकडे केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मालवण नगरपरिषद समोरील आपल्या हद्दीतील कसाल मालवण रस्त्याची साईड पट्टी अत्यंत धोकादायक आहे. किमान १ फूट खाली आहे. शाळेची मुले या ठिकाणी पडून त्यांना दुखापत झाली आहे. मोठया अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत या पूर्वी आपल्या विभागाला फोन व्दारे पण कळविले, पण कार्यवाही झाली नाही. तरी तात्काळ नगरपरिषद समोरील पूर्ण साईड पट्टी रोड लेवल करून येत्या ४ दिवसात कार्यवाही व्हावी. अशी मागणी करण्यात आली आहे.