
कुडाळ मालवण मतदारसंघातील २५/१५ व पर्यटन संदर्भातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा
मालवण | प्रतिनिधी : मालवण कुडाळ भाजपा विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ मालवण तालुक्यातील २५/१५ व पर्यटन संदर्भातील विविध विकास कामांबाबत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांची आज भेट घेतली. यावेळी आमदार नितेश राणे ही उपस्थित होते.
या भेटीत विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा झाली असून कुडाळ मालवण मतदारसंघासाठी विकासनिधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. अशी माहिती निलेश राणे यांच्या वतीने देण्यात आली आहे.










