कारीवडे येथील भंडारा उत्सव शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी.

ओटवणे (प्रतिनिधी ) कारिवडे गोसावीवाडी येथील सिद्धयोगी महापुरुष मठाचा भंडारा उत्सव रविवारी १ फेब्रुवारी रोजी उत्साहात संपन्न होत आहे.

सिद्धयोगी महापुरुषाचा हा प्राचीन मठ असून येथे नाथपंथी समाजाची संस्कृती आणि परंपरा जोपासली जाते. त्यामुळे अध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रात नवनाथांनी केलेल्या समाजजागृतीचीआणि संप्रदायिक भावनेची येथे प्रचिती येते. हे एक जागृत देवस्थानही मानले जाते. तसेच राजसत्ता व पूर्वमागाला जोडलेल्या या देवस्थानचा भंडारा उत्सव नाथपंथी परंपरेनुसार सुरू आहे.

या उत्सवानिमित्त मठात रविवारी सायंकाळी ७ वाजल्यापासून नाथसंप्रदयाच्या विधीनुसार पूजा मांड घालून मंत्र म्हणून घट स्थापना करण्यात येणार आहे. त्यानंतर सिद्ध महापुरुषाच्या बोलणे व नवस बोलणे,फेडणे यासाठी भाविकाची रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होणार आहे. रात्री १०.३० च्या सुमारास ग्रामदैवत कालिका मंदिरातून देवीच्या उत्सव मूर्तीसह तरंग सवाद्य महापुरुषाच्या समाधीकडे रवाना झाल्यानंतर भाविकांच्या अलोट गर्दीत सवाद्य पालखी मिरवणुकीने सिद्धमहापुरुष मंदिराकडे आगमन झाल्यानंतर प्रथम महिला औक्षण करतात. त्यानंतर सिद्ध महापुरुष आणि कालिका मातेच्या अविस्मरणीय भेट घडविली जाते. मध्यरात्री १२ वाजता उत्सव गाऱ्हाणे भंडारा त्यानंतर या महत्वपूर्ण प्रसाद अर्थात रखवालीसाठी घालण्यात येते. त्यानंतर सा लाबाद प्रमाणे उशिरा ओटवणे दशावतार मंडळाचा दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे.कारीवडे बरोबर ओटवणे येथील मानकऱ्यांना येथे मोठा मान असल्याने दोन्ही गावांसाठी हा एक आगळा वेगळा उत्सव असतो. दोन्ही गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहतात.

सोमवारी सायंकाळी या मठातील कालिकादेवीच्या उत्सवमूर्तीसह तरंग व पालखीचे कालिका मंदिरात प्रस्तान झाल्यानंतर या भंडारा उत्सवाची सांगता नाथ संप्रदयातील विविध परंपरांचे पालन करून होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.