ओटवणे (प्रतिनिधी) ओटवणे गावठणवाडी येथील बबलू गावकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित भव्य अशा ध्रुव चषक स्पर्धेत पुनः एकदा मोठा बदल करण्यात आला असून ही स्पर्धा आता शुक्रवार २०,२१ व २२ फेब्रुवारी २०२६ रोजी खेळविण्यात येणार आहे. ओटवणे ग्रामपंचायत नजिक मैदानात काँक्रीटच्या खेळपट्टीवर तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी भक्षिसांच्या रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे या स्पर्धेतील 1 लाख रुपयाच्या बक्षीसामध्ये तब्बल 50 हजाराची वाढ करत 150002, द्वितीय 100002तर तृतीय 30002 व चतुर्थ 15002 आणि विशेष म्हणजे एन्ट्री फीस ही 15000 वरून 12000 एवढी करण्यात आली आहे. या स्पर्धेत इतरही आकर्षक भक्षिसे ठेवण्यात आली आहेत या संधीचा लाभ घ्यावा प्रथम येणाऱ्या 16 संघाना या स्पर्धेत खेळविण्यात येईल.ही स्पर्धा पूर्णतः खुली असल्याने स्पर्धेत गोवा,महाराष्ट्रा बरोबर इतरही भागातून मोठे खेळाडू सहभागी होणार असल्याने क्रिकेट शौकीनांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन बबलू गावकर आणि मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघानी आकाश मेस्त्री ९३५६६७२७७४ उदीत गांवकर ७८२०८१४३६५ आणि विशाल गांवकर ९४०४९३०२६० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सचिन गांवकर, बबलू गावकर यांनी केले आहे.












