राजापूरात आमदार किरण सामंत यांचा काँग्रेस आणि उबाठाला धक्का

काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर यांसह शेकडो जणांचा शिवसेनेत प्रवेश

राजापूर (प्रतिनिधी): जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत आमदार किरण सामंत यांनी काँग्रेस आणि उबाठाला जोरदार धक्का दिला आहे. काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर, सुभाष बाकाळकर यांसह काँग्रेसचे ओबीसी तालुकाध्यक्ष संतोष कुळये, पांगरे सरपंच वैष्णवी कुळये, उबाठाच्या राजापूर अर्बन बँकेच्या संचालिका प्रतिभा रेडीज यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
या सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार किरण सामंत यांनी पक्षात स्वागत करत प्रवेशकर्त्यांचा पक्षात योग्य सन्मान केला जाईल अशी ग्वाही दिली.
राजापूर नगर वाचनालय सभागृहात शनिवारी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार राजन साळवी, अविनाश लाड, राजू कुरूप, अशफाक हाजू, प्रकाश कुवळेकर, रविंद्रनागरेकर, दिपक बेंद्रे,  एड. यशवंत कावतकर, दुर्वा तावडे, प्रणोती भोसले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर यांनी काही दिवसांपुर्वीच काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांनी शिवसेना प्रवेशाचे संकेत दिले होते. तर सुभाष बाकाळकर यांना शिवसेनेकडून स्विकृत नगरसेवकपद देण्यात आले होते.
याप्रसंगी खामकर यांसह काँग्रेसचे डॉक्टर्स सेलचे अध्यक्ष डॉ. हसन लांजेकर, कोळंबचे माजी ग्रामपंचायत सदस्य संजय पाटेकर, शैलेंद्र संसारे, मनसेचे माजी उपविभागप्रमुख संदेश मोरे, हातिवले ग्रा. प. सदस्या जान्हवी धालवलकर, उदय धालवलकर, विनोद धालवलकर, तुषार नेवरेकर, दिनेश बाकाळकर, रोहन कुवेसकर, मयुर खानविलकर, प्रशांत बाकाळकर यांसह काँग्रेस व उबाठाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला.