यशस्वी होण्यासाठी शिक्षण हेच सर्वात महत्वाचे साधन-एड.हुस्नबानू खलिफे

नवजीवन क. महाविद्यालयात बारावी विद्यार्थ्यांना निरोप

राजापूर (वार्ताहर): ‘आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षण हेच सर्वात महत्वाचे साधन आहे, विद्याथ्यांनी शिक्षित होऊन आपल्या शिक्षणाचा लाभ आपल्या भोवतालच्या सर्वांना होऊ दयावा’ असे प्रतिपादन राजापूर च्या लोकनियुक्त नगराध्यक्षा व विधान परिषदेच्या माजी आमदार अॅड. सौ. हुस्नबानू खलिफे यांनी येथे बोलताना व्यक्त केले.
राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या नवजीवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या 12 वी च्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण व सदिच्छा समारंभ कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुलतान ठाकूर होते.
यावेळी व्यासपिठावर नगरसेवक अॅड. जमिर खलिफे, संस्था सचिव मजीद पन्हळेकर, खजिनदार म. हनीफ काझी, सदस्या श्रीम. हसीना मुकरी, नगरसेविका श्रीम. अमिना गडकरी, श्रीम. शबाना मुल्ला, श्रीम. अफरोज झारी, खरवते येथील शौकत काझी, सामाजिक कार्यकर्ते मोहन पाडावे, प्रशालेचे प्राचार्य राजेंद्रकुमार व्हनमाने आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्या अॅड. हुस्नबानू खलिफे यांचा शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर अॅड. खलिफे यांनी बोलताना सांगीतले की सतत शिकत राहण्याची आपली अभ्यासू वृत्ती आपणास कशी दिशादर्शक ठरली ते हि त्यांनी सांगीतले व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रशालेचे प्राचार्य राजेंदकुमार व्हनमाने यांनी बोलताना सांगीतले की विद्यार्थ्यांनी परीक्षेबरोबरच आपल्या आयुष्यातील प्रश्न विचारपूर्वक सोडवण्यावर भर द्यावा व यश प्राप्तीनंतर नम्र राहून जीवनाला सामोरे जा असे सांगीतले. संस्था सचिव मजीद पन्हळेकर यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
अॅड. जमिर खलिफे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व आपल्या नवजीवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीदशेतील आठवणर्णीना उजाळा दिला तसेच आपली शैक्षणिक व राजकिय वाटचाल कथन केली. त्यानंतर राजापूर नगर परिषदेवर नवनिर्वाचित निवड झालेल्या नगररसेवक सुलतान ठाकूर, अॅड. जमिर खलिफे, नगरसेविका अमिना गडकरी, शबाना मुल्ला, अफरोज झारी यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. त्यानंतर वर्षभरातील विविध स्पर्धामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना अॅड. हुस्नबानू खलिफे तसेच मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थी प्रतिनीधी सुरज धुमाळ, प्रांजल करंजवकर, प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय व स्वागत प्रा. ज्ञानदा असोलकर पारितोषिक वाचन प्रा. सुनिता कोकरे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. प्रितम सुर्वे यांनी तर आभार प्रा. उज्या मुल्ला यांनी मानले.