राजापूर (प्रतिनिधी): भाजपा शिवसेना आणि मित्र पक्षाच्या महायुतीचे धोपेश्वर पंचायत समिती गणातील उमेदवार अभिजित गुरव यांनी थेट मतदारांच्या गाठीभेटी घेत वाडीवस्तीवर प्रचार केंद्रीत केला आहे. या प्रचारात त्यांना जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
अभिजित गुरव हे धोपेश्वर पंचायत समिती गणातुन महायुतीचे उमेदवार म्हणुन निवडणूकीच्या रिंगाणात आहेत. त्यांच्यासाठी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते निवडणूकीच्या प्रचारात उतरले आहेत. आता प्रचाराला चांगलीच धार आली असून गुरव हे धोपेश्वर पंचायत समिती गणात वाडीवस्तीवर जाऊन मतदारांशी थेट संवाद साधून प्रचार करत आहेत.
गेल्या दहा ते पंधरा वर्षात त्यांनी या भागात केलेली कामे सांगतानाच भविष्यात या गणाच्या विकासाठी केले जाणारे प्रयत्न व नियोजनही ते मतदारांसमोर मांडत आहेत. या गणातील रस्ते, पाणी, विजपुरवठा या प्राथमिक प्रश्नांची सोडवणूक करतानाच भविष्यात रोजगाराच्या माध्यमातुन आर्थिक विकास कशा प्रकारे करता येईल, इथल्या तरूणाच्या हातात काम कसे मिळेल यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे गुरव हे मतदारांना सांगत आहे.
गुरव यांच्या विजयासाठी महायुती एकदिलाने काम करत असून मतदारांचाही गुरव यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे गुरव यांनी सांगितले. लोकांना विकास हवा आहे, आणि हा विकास महायुतीच्या माध्यमातुन आंम्ही करू असा जनतेला विश्वास आहे, त्यामुळे जनता आपल्या पाठीशी असल्याचे गुरव यांनी सांगितले.











