राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील जुवाठी पंचायत समिती गणातील अपक्ष उमेदवार प्रकाश भिवंदे यांनी गाव व वाडीवस्तीवर भेट देत थेट मतदारांशी संपर्क साधन प्रचारात बाजी मारली आहे. त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून विकासासाठी या गणातील जनता आपल्या पाठीशी असून आपला विजय निश्चित निसल्याचा दावाही भिवंदे यांनी केला आहे.
प्रकाश भिवंदे यांनी आपली बांधीलकी जनतेशी असून याच भावनेतून त्यांनी आपला वचननामा प्रसिध्द केला आहे. यामध्ये त्यांनी जुवाठी पंचायत समिती मध्ये समाविष्ठ गावे प्रत्येक गावाच्या प्रत्येक वाडीत दळणवळणासाठी पक्के रस्ते, व सांडपाणी निचरा होण्यासाठी बंदिस्त गटारे उपलब्ध करण्यासाठी आपण पाठपुरावा करू. तसेच प्रत्येक गावात लोक कल्याणासाठी प्रशासकीय कार्यालय, व कार्यालयांसाठी इमारती बांधून घेणे, प्रशासकीय अधिकारी यांच्या मार्फत सर्व नागरिकांना उत्तम दर्जाची सेवा देऊ शकू यासाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
केंद्र व राज्य शासनाने नागरिकांच्या सुविधांसाठी राबविलेल्या लोक कल्याणकारी योजना राबविलेल्या आहेत. या सुविधांपासून वंचित राहणाऱ्या सर्व नागरिकांना या योजना मिळवून देण्याचा प्रयत्न करीन. तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने परिसरातील अनेक युवक रोजगार संधीच्या शोधात स्थलांतरीत होत आहेत. यामुळे गावातील अनेक घरे बंद आहेत. याचा परिणाम स्वर्गाहून सुंदर असणारी ही कोकणची भुमी भकास होताना दिसत आहे. सर्व सुशिक्षीत बेरोजार तरुणाना नोकरी, व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशिल राहीन.
तसेच जुवाठी पंचायत समिती गणातील आरोग्य विषयक सुविधांसाठी उपलब्ध असणारी आरोग्य केंद्र, उपकेंद्रे या ठिकाणी तज्ञ पुरेसे डॉक्टर व स्टाफ, अद्यायवत मशिनरी उपलब्ध करुन चांगल्या आरोग्य विषयक सुविधा नागरीकांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. पर्यावरणात वेळोवेळी होणारे बदल यामुळे शेती उत्पादनावर होणारा परिणाम, शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यासाठी विभाग कंपन्या व शासन स्तरावर या समस्या मांडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे प्रयत्न करीन. तसेच समाजातील विधवा, विधुर, अपंग, दर्बल घटकातील प्रत्येक नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन देईन. विज्ञान तंत्रज्ञानातील बदलास अनुसरुन अद्यायवत उपकरणे वापरुन उत्पादन क्षमता वाढविणे. शेतीपुरक व्यवसाय करणेस प्रवृत्त करणे, यामुळे मानवी जिवनात स्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न मी करीन.
त्याचबरोबर शैक्षणिक बाबतीत विद्यार्थी पालक व समाज यांच्या आवश्यकतेनुसार अद्ययावत सुविधा, शैक्षणिक प्रवाहामध्ये होणारे बदल या विषयी शिक्षण संस्था चालकांशी संपर्क साधून अद्यायवत नव नविन विचार प्रवाह अंमलात आणून कौशल्य धिस्टीत शिक्षण उपलब्ध करुन देणे यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले आहे. माझ्या वचन नाम्यात समाविष्ट केलेल्या या सर्व बाबी शासन दरबारी मांडण्यासाठी मला बहुमताने निवडूण द्या असे आवाहन केले आहे.












