जुवाठी जिल्हा परिषद गटासह जुवाठी व केळवली पंचायत समिती गणांमध्ये शिवसेनेचा झंझावात

संपुर्ण जुवाठी गणाच्या सर्वागिण विकासासाठी निवडणूकीच्या रिंगणात जनता आमच्या पाठीशी
जि. प. गटाचे उमेदवार रमेश सुद यांसह पं. स. उमेदवार प्रसाद मोहरकर व भाग्यश्री लाड यांचा विश्वास
राजापूर (प्रतिनिधी): जुवाठी जिल्हा परिषद गटासह या गटात येणाऱ्या जुवाठी व केळवली या दोन्ही पंचायत समित गणात शिवसेनेच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे. शिवसेनेचे जुवाठी जि. प. गटाचे उमेदवार रमेश सुद व जुवाठी पंचायत समिती उमेदवार प्रसाद मोहरकर व केळवली पंचायत समिती उमोदवार भाग्यश्री लाड यांना या भागातील मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. या भागाच्या सर्वांगिण विकासासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडविसासाठी आंम्ही निवडणूकीच्या रिंगणात असून राज्याचे माजी राज्यमंत्री कै. भाईसाहेब हातणकर यांचे जन्म गाव या गट व गणांमध्ये असल्याने त्यांच्या नावाला साजेसे काम आंम्ही करू व जनतेचे प्रश्न मार्गी लावू असा विश्वास रमेश सुद, प्रसाद मोहरकर व भाग्यश्री लाड यांनी व्यक्त केला आहे.
राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत व राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली आंम्ही काम करत आहोत. विकासाची दुरदृष्टी ठेऊन हे दोन्ही लोकप्रतिनिधी जनतेसाठी काम करत आहेत. त्यांच्या माध्यमातुन केवळ जुवाठी गट वा गण नाही तर संपुर्ण राजापूर तालुक्यात विकासाचा झंझावात सुरू आहे. त्यामुळे भविष्यातही या विकासात खंड पडणार नाही, उलट आमच्या भागाचा विकास अधिक जोमाने होईल असेही या तिघांनी नमुद केले.
रमेश सुद हे प्रथमच निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. राजापूर तालुका कुणबी पतपेढीचे संचालक असलेले सुद हे गेली २० वर्षे सामाजिक व राजकिय क्षेत्रात कार्यरत आहेत. राजापूर तालुका कुणबी समाजोन्न्ती संघ मुंबई ग्रामीण शाखा राजापूरचे ते उपाध्यक्ष आहेत. कुणबी समाजाच्या विविध संघटनांवर ते काम करत आहेत. तर तळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी दहा वर्षे काम करत आहेत. या कालवधीत त्यांनी गावासह पंचक्रोशीतील अनेक समस्या व प्रश्नांना न्याय दिला आहे. कै. भाईसाहेब हातणकर यांचे एक निष्ठावान पाईक अशी त्यांची ओळख आहे. सामाजिक, राजकिय व सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुद यांना शिवसेनेने जुवाठी जि. प. गटातुन उमेदवारी दिली असून त्यांना मतदारांचा चांगला पाठींबा मिळत आहे.
तर जुवाठी पंचायत समिती गणातुन प्रसाद मोहरकर हे निवडणूक लढवत आहेत. सामाजिक, सहकार व राजकिय क्षेत्रात एक धडपडणारे युवा नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. राजापूर अर्बन बँकेचे संचालक असेलेले मोहरकर यांनी जुवाठी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणूनही काम केलेले आहे. राजापूर अर्बन बँकेचे उपाध्यक्षपदही त्यांनी भुषविले आहे. तर जुवाठी सह तालुक्यातील विविध सामाजिक संस्थांवर विविध पदांवर ते कार्यरत आहेत. सहकाराची आवड असलेल्या मोहरकर यांनी तालुक्यात हिरकणी दुध संकलन केंद्र सुरू करून दुग्ध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. एक शांत, संयमी व अभ्यासू व्यक्तीमत्व असलेले व तरूण उद्योजक असलेले मोहरकर हे प्रथमच शिवसेनेकडून जुवाठी पंचायत समिती गणातुन निवडणूक लढवत असून त्यांचा मतदार संघात असलेला दांडगा लोकसंपर्क याचा लाभ त्यांना या निवडणूकीत होणार आहे.
जुवाठी गटातील दुसऱ्या केळवली पंचायत समिती गणातुन भाग्यश्री लाड या शिवसेनेच्या उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्या दुसऱ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात आहेत. यापुर्वीं त्यांनी या भागाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. तर त्या काळात त्यांनी तालुका पंचायत समितीचे उपसभापतीपदही भूषविलेले आहे. त्या काळात त्यांनी या भागातील विकासाला गती दिलेली आहे. खास करून महिलांसाठी त्यांचे मोठे योगदान असून वैयक्तीन अनेक योजनांचा त्यांनी जनेतला लाभ मिळवून दिलेलवा आहे. त्यामुळे त्यांना पंचायत समितीच्या कामाचा अनुभव त्यांच्या पाठीशी असून या भागात त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या भागातील जनतेचा आंम्हाला चांगला पाठींबा मिळत असून विकासासाठी जनता आमच्या पाठीशी राहील असा विश्वास व्यक्त करत आमचा विजय निश्चित असल्याचा दावा या तिन्ही उमेदवारांनी केला आहे
फोटो: रमेश सुद, प्रसाद मोहरकर, भाग्यश्री लाड