शृंगारतळी जिल्हा परिषद गटात मतदारांचे मिळतेय पाठबळ
गुहागर प्रतिनिधी
तालुक्यात गेली अनेक वर्षे आरोग्य सेवेत अग्रेसर असणारे डॉ राजेंद्र पवार हे प्रथमच शृंगारतळी जिल्हा परिषद गटातून युतीकडून भाजपचे उमेदवार म्हणून निवडून रिंगणात उतरले आहेत. गेली अनेक वर्षे सर्वसामान्य जनतेशी नाळ असलेले डॉ. राजेंद्र पवार यांना येथील मतदारांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
डॉ. राजेंद्र पवार हे एक उच्चशिक्षित आणि गेली अनेक वर्षे गुहागर तालुक्यात आरोग्य सेवेत अग्रेसर असणारे आणि प्रशासनावर अतिशय उत्तम पकड असलेले डॉ. राजेंद्र पवार हे संपूर्ण तालुक्यात परिचित आहेत.कोरोना काळात देखील त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे येथील रुग्णांना सहकार्य केले होते.त्यामुळे त्यांना मतदारांचा भरभरून पाठिंबा मिळत आहे.
गेली अनेक वर्ष तालुका आरोग्य विभागात कार्यरत असलेले डॉ राजेंद्र पवार यांनी तालुका आरोग्य अधिकारी म्हणून यशस्वीपणे कामकाज केले आहे.त्यामुळे त्यांच्या या अनुभवाचा येथील जनतेला नक्कीच फायदा होणार आहे.तर सध्या डॉ. राजेंद्र पवार यांनी आपली स्वतंत्र वैद्यकीय सेवा सुरू केली असून विविध अनुभवी वैद्यकीय अधिकारी याठिकाणी येऊन रुग्णांना सेवा देत असतात.त्यामुळे डॉ.पवार आहे येथील जनतेमध्ये परिचित आहेत. मूळ गाव कारुळ असल्याने येथील पंचक्रोशीत डॉ. पवार यांचे पूर्वीपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत.तर सध्या चिखली येथे वास्तव्यास असणारे डॉ राजेंद्र पवार आपल्या संपूर्ण जिल्हा परिषद गटातून एक जनतेशी नाळ जोडलेला माणूस म्हणून ओळखले जात आहेत.त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत युतीच्या माध्यमातून भाजपकडून निवडणूक रिंगणात असलेले डॉ. राजेंद्र पवार यांना प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मतदारांकडून चांगला पाठिंबा मिळत आहे.











