कोमसाप तर्फे भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त अनेक स्पर्धांचे पारितोषिक वितरण

रत्नागिरी : 

कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रत्नागिरी च्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व, कथाकथन व काव्यलेखन स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ जिल्हाध्यक्ष आनंद शेलार यांच्या अध्यक्षतेखाली
प्राचार्य मधुरा पाटील,जाधव मॅडम, तालुकाध्यक्ष प्रा. चंद्रमोहन देसाई, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड,विनायक हातखंबकर,अंजली पिलणकर, डॉ.आनंद आंबेकर विद्याधर कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न करण्यात आला.

स्वागत विनायक हातखंबकर यांनी तर प्रास्ताविक चंद्रमोहन देसाई यांनी केले.सदर तालुकास्तरीय स्पर्धा युवागट व खुलागट अशा दोन गटामध्ये घेण्यात आल्या.
वक्तृत्व स्पर्धा – युवा गट
प्रथम – सेजल भार्गव मेस्त्री
व्दितीय विभागून –
गौरवी मंदार ओळकर
केतकी लक्ष्मीकांत केतकर
तृतीय – रिया सुनिल वालम
खुला गट
प्रथम-जयंत गोपाळ फडके
व्दितीय -मानसी मंगेश चव्हाण
तृतीय विभागून
आभा राजेंद्र घाणेकर
दामोदर परशुराम लिंगायत
कथाकथन स्पर्धा
युवा गट
प्रथम- गौरवी मंदार ओळकर
व्दितीय -दिप्ती प्रकाश दोरखडे
तृतीय – सेजल भार्गव मेस्त्री
खुला गट
प्रथम -उमेश नामदेव मोहीम
व्दितीय – मानसी मंगेश चव्हाण
तृतीय विभागून
जयंत गोपाळ फडके
संपत भाऊराव पाटील
उत्तेजनार्थ – संतोष शांताराम गार्डी
विशेष उल्लेखनीय कथा
नरेंद्र गावंड
काव्यलेखन स्पर्धा
युवागट
प्रथम-रत्नेश अनिल कांबळे
व्दितीय -ईशिका अजय हरचकर
तृतीय -श्रावणी प्रविण धनावडे
खुलागट
प्रथम -दत्ताराम शावरप्पा कांबळे
व्दितीय -अमित शंकर पवार
तृतीय -मानसी मंगेश चव्हाण
सर्व विजयी स्पर्धकांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
तसेच स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी सहभाग प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

वरील सर्व स्पर्धांचे परिक्षण विनायक हातखंबकर, विशाखा सकपाळ,अनंत जाधव, डाॅ. निधी पटवर्धन, प्रकाश सावंत यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ.आनंद आंबेकर, विनायक हातखंबकर, चंद्रमोहन देसाई,अंजली पिलणकर, श्रध्दा बोडेकर,मिरगल,मानसी चव्हाण, यांनी प्रयत्न केले.
यावेळी मधुरा पाटील, आनंद शेलार, चंद्रमोहन देसाई यांनी मार्गदर्शन केले. मानसी चव्हाण आणि गौरवी ओळकर यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा बोडेकर यांनी केले तर आभार विद्याधर कांबळे यांनी मानले.