जुवाठी गटासह जुवाठी व केळवली गणांचा सर्वांगिण विकास हाच आमचा ध्यास- रमेश सुद, प्रसाद मोहरकर व भाग्यश्री लाड

राजापूर (प्रतिनिधी): जुवाठी जिल्हा परिषद गटासह या गटात येणाऱ्या जुवाठी व केळवली या दोन्ही पंचायत समिती गणांचा सर्वांगिण विकास हाच आमच ध्यास असून विकासासाठी या विभागील मतदार आमच्या ठामपणे पाठीशी उभे असल्याचा विश्वास शिवसेनेचे जुवाठी जि. प. गटाचे उमेदवार रमेश सुद व जुवाठी पंचायत समिती उमेदवार प्रसाद मोहरकर व केळवली पंचायत समिती उमोदवार भाग्यश्री लाड यांनी व्यक्त केला आहे.

जुवाठी जिल्हा परिषद गटातील शिवसेना उमेदवार रमेश सुद, जुवाठी पंचायत समिती गणातील उमेदवार प्रसाद मोहरकर व केळवली पंचायत समिती गणातील उमेदवार भाग्यश्री लाड यांना या विभागात मतदारांचा उस्फुर्त पाठींबा मिळत आहे. हे तिन्ही उमेदवार हे कामाचा अनुभव असलेले व विकासाची जाण असलेले असे उमेदवार आहेत. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कायमच आघाडीवर असलेल्या या तिन्ही उमेदवारांना सर्वसामान्य जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

रमेश सुद व प्रसाद मोहरकर यांनी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून काम केलेले असल्याने त्यांच्या पाठीशी कामाचा दांडगा अनुभव आहे. विविध योजनांची माहिती त्यांना आहे. सुद व मोहरकर यांना सहकार क्षेत्रातील कामचाही चांगला अनुभव असून सहकाराच्या माध्यमातुन या गट व गणांमध्ये भविष्यात आर्थिक विकासाला गती देण्याचा त्यांचा संकल्प आहे. तर भाग्यश्री लाड यांनी पंचायत समितीमध्ये पाच वर्षे सदस्य म्हणून काम करतानाच उपसभापतीपदही भूषविलेले आहे. त्यामुळे त्यांना पंचायत समितीतील कामाचा दांडगा अनुभव आहे. या तिन्ही उमेदवारांच्या या अनुभवाचा फायदा भविष्यात या भागाच्या विकासाला होणार आहे.

भविष्यात रस्ते, विज, पाणी, आरोग्य व शिक्षण या सुविधांबरोबरच रोजगार निर्मितीसाठी काय नियोजन करण्यात येईल यासाठी या तिन्ही उमेदवारांकडून नियोजन केले जात आहे. या भागात रेल्वे स्थानक असल्याने या माध्यमातुन स्थानिकांना काय लाभ मिळवून देता येतील यासाठीही हे तिन्ही उमेदवार प्रयत्नशील आहेत. तर पर्यटनाच्या माध्यमातुन विकासासाठी या उमेदवारांकडून भविष्यात काम करण्याचा संकल्प आहे. त्यामुळे या भागाला सर्व बाजुंनी कशा प्रकारे विकासाला गती देता येईल यासाठी आंम्ही काम करणार असल्याचे सुद, मोहरकर व लाड यांनी सांगितले.

राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरीचे पालमंत्री ना. उदय सामंत व राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली आंम्ही भविष्यातही या भागाच्या विकासासाठी मोठया प्रमाणावर निधी आणून आंम्ही विकास करू अशी ग्वाहीही सुद, मोहरकर व लाड यांच्याकडून दिली जात आहे.