आंबोली घाटात झाड कोसळले : वाहतूक ठप्प

आंबोली घाटात झाड कोसळले : काही काळ वाहतूक ठप्प

ग्रामस्थ आणि वाहनधारकांच्या मदतीने रस्ता मोकळा करण्यात यश

माडखोल । लखन आडेलकर : दाणोलीपासून चार किलोमीटर मागे आंबोली घाटात एक भले मोठे जांभळाचे झाड महामार्गावर कोसळले. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. हे झाड मार्गावर मधोमध कोसळल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. शेवटी वाहनधारक तसेच स्थानिक नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन रस्त्यावर पडलेले झाड बाजूला केले. त्यानंतर तब्बल एका तासानंतर आठच्या सुमारास वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.