जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी केले लोकार्पण
मसुरे | झुंजार पेडणेकर : ग्रामपंचायत आडवली मालडीच्या वतीने बनविलेल्या सेल्फी पॉईंटचे उदघाटन गावचे सुपुत्र, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या हस्ते करण्यात आले. मालवण तालुक्यात ग्रामपंचायतच्या वतीने बनविलेला पहिला सेल्फी पॉईंट ठरला आहे. यावेळी सरपंच श्री. संदीप आडवलकर, उपसरपंच सौ सोनाली पराडकर, सदस्य सौ. ज्योती लाड, श्री सुनील जाधव, सामाजिक कार्यकर्ते श्री. अरुण लाड , श्री अरविंद साटम श्री विठ्ठल घाडी, श्री विष्णू घाडीगांवकर, माजी उप सरपंच श्री विनोद साटम, पोलीस पाटील चंद्रदिपक मालडकर, पशु पर्यवेक्षक श्री महेश परुळेकर, श्री सागर तांबे, डॉ सुरेश भोगटे, पळसंब गावचे नवनिर्वाचित सरपंच श्री महेश वरक, ग्रामसेवक श्री युवराज चव्हाण, आडवली मालडी रिक्षा संगठना सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग व गावातील मान्यवर व्यक्ती व ग्रामस्थ उपस्थित होते