ओटवणे शाळा नंबर 1 च्या बूथ वर दुपारी 2 पर्यंत 48 % मतदान

ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे शाळा नंबर 1 च्या बूथवर दुपारी 2.00 वाजेपर्यंत 48 % मतदान झाले असून सकाळच्या सत्रात मतदाराचा कमी प्रतिसाद मिळाला मात्र दुपार नंतर मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली. ओटवणे शाळा नंबर 1 च्या एका बूथ वर 616 पैकी 325 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर दुसऱ्या बूथवर 730 पैकी 320 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावली. दुपारनंतर गर्दी वाढत असून मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. मतदान प्रक्रिया शांततेत सुरु असून मतदार मतदानाचे कर्तव्य प्रामाणिक पणे बजावीत आहेत.