मसुरे | झुंजार पेडणेकर : मालवण तालुक्यातील श्री शांतादुर्गा देवी सभामंडप- वडाचापाट, पाटकरवाडी बंधु मंडळ आणि आप्तेष्टचे सक्रिय सदस्य श्री.अक्रुर अशोक पाटकर यांनी पाटकरवाडी बंधु मंडळच्या वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधुन जि. प. ,पुर्ण प्राथमिक शाळा वडाचापाट येथील केंद्र शाळे मध्ये सर्व शालेय विद्यार्थी,विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य म्हणून वहया वाटप केले. यावेळी अक्रुर अशोक पाटकर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करताना विद्यार्थी, विद्यार्थिनी कला, क्रिडाक्षेत्र,स्काॅलरशिप, विविध बौद्धिक चाचण्या तालुका आणि जिल्हा स्तरीय परीक्षेमध्ये सुयश प्राप्त केल्या बद्दल शाळेचे मुख्याध्यापिका, सहकारी शिक्षक वर्ग,पालक वर्गाचे अभिनंदन केले.
आपली शाळा खुप जुनी प्राथमिक शाळा आहे. याच शाळेने कित्येक विद्यार्थी विद्यार्थिनींना घडविले जे आज वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी,वेग वेगळ्या पदावर कार्यरत आहेत. असे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षक श्री. प्रकाश पवार यांनी केले.
मुख्याध्यापिका सौ. पूजा वि. मालंडकर, सहकारी शिक्षक सौ. सानिका पालव ,सौ. सेजल परब ,
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. गणेश तावडे, श्री. उमेश मुणगेकर, श्री. निलेश कासले,सौ. वृषाली पाटकर, सौ. ओवी पाटकर, श्री. विजय कदम उपस्थित होते.













