कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं,दोघांचा मृत्यू

प्रतिनिधी /रोहन कांबळे

कोल्हापूर : जिल्ह्यातील अत्यंत गजबलेल्या शाहू मिल चौकामध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात क्रेटा कारने दुचाकीला उडवल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातामध्ये क्रेटाने धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार दूर उडून पडल्याने अत्यंत गंभीर जखमी झाले. त्यांना अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. दरम्यान, उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, क्रेटा कारने धडक दिल्यानंतर क्रेटाकार ही रस्त्याच्या मधोमध उलटी झाली होती. तर धडक दिलेल्या दुचाकीचा चक्काचूर झाला होता. रस्त्याच्या कडेला पडजागेत दुचाकीस्वार जाऊन कोसळले. त्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण करत जखमींना सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. अपघातानंतरचे दृश्य अतिशय भयावह होते. ज्या दुचाकीला धडक बसली, तिचा अक्षरशः चक्काचूर झाला. धडकेमुळे दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला असलेल्या पडिक जागेत जाऊन कोसळले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या तरुणांना पाहून मदतीसाठी धावलेल्या लोकांच्याही पायाखालची जमीन सरकली. दुसरीकडे, रस्त्याच्या मधोमध पलटी झालेली कार आणि चारी बाजूंना विखुरलेले काचेचे तुकडे अपघाताची भीषणता सांगत होते.यावेळी तत्काळ पोलीस दाखल झाले. पोलिसांनी पलटी झालेली क्रेटा बाजूला करता वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. यावेळी बघ्यांचा मोठा जमाव जमला होता.