देवगड मध्ये सुमारे 57% मतदान

देवगड : प्रतिनिधी

देवगड तालुक्यात जि.प.व पं.स.निवडणुकीसाठी शनिवारी मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली.तालुक्यात एकूण सरासरी ५७.१२ टक्के मतदान झाले.तिर्लोट, मिठमुंबरी व दाभोळे येथील केंद्रावर मतदानयंत्रात बिघाड झाल्यामुळे मतदानप्रक्रिया काही काळ खोळंबली होती मात्र मतदानयंत्र तात्काळ बदलण्यानंतर मतदानप्रक्रिया सुरळीत सुरू झाली.जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी देवगड तालुक्यात मतदानकेंद्रावर भेट देवून मतदानप्रक्रियेचा आढावा घेतला.

देवगड तालुक्यातील ३ जि.प.गट व ८ पं.स.गणासाठी ८२ केंद्रावर शनिवारी मतदान झाले.मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली.निवडणुक विभागाने दिलेल्या माहितीनूसार तालुक्यात एकूण सरासरी ५७.१२ टक्के मतदान झाले.यामध्ये जि.प.गटनिहाय झालेले मतदान- पुरळ ६१.२०, शिरगाव ५०.६२ व कुणकेश्वर ५०.७६ तर पं.स.गणनिहाय झालेले मतदान- पुरळ ६५.८, तिर्लोट ५७.३३, मणचे ६०.९७, पोंभुर्ले ५७.५, तळवडे ५०.६२, qकजवडे ५१.७०, मुणगे ५९.१० व कुणकेश्वर ६२.७६ असे मतदान झाले. ५३ हजार १४२ मतदारांपैकी ३० हजार ३५३ मतदारांनी मतदान केले.तालुक्यात सरासरी ५७.१२ टक्के मतदान झाले.यापैकी १५,६९७ पुरूष व १४,६५५ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदानप्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.