दोडामार्ग तालुक्यात ५९ टक्के मतदान; २९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

​दोडामार्ग :प्रतिनिधी

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ३ आणि पंचायत समितीच्या ६ जागांसाठी शनिवारी उत्साहात मतदान पार पडले. प्रशासनाने केलेल्या चोख नियोजनामुळे संपूर्ण तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. एकूण ५९ टक्के मतदानाची नोंद झाली असून, रिंगणात असलेल्या २९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आता मतपेटीत बंद झाले आहे.

माटणे ​हायव्होल्टेज लढतींकडे सर्वांचेच लक्ष!!!
काही ठिकाणी उबाठा सेनेचे बूथ नाहीच

​या निवडणुकीत प्रामुख्याने महायुती, उद्धवसेना आणि अपक्ष यांच्यात चुरशीचा सामना पाहायला मिळाला.

​माटणे जिल्हा परिषद गटात हायव्होल्टेज गटात सकाळच्या सत्रात मतदारांचा प्रतिसाद संथ होता, मात्र दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढला. येथे महायुती आणि अपक्ष उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत केली.यामध्ये जिल्हा परिषदेचे भाजपाचे उमेदवार दिपक गवस अपक्ष राजेंद्र म्हापसेकर व उबाठाचे बाबुराव धुरी यांचेत लढत होतं आहे या ठिकाणी युतीच्या कार्यकर्त्यावर या मतदानाची भिस्त राहिली आहे

​साटेली-भेडशी गट: येथे महायुती विरुद्ध उद्धवसेना अशी थेट दुरंगी लढत पाहायला मिळाली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. विशेष म्हणजे, या गटात महिला मतदारांची उपस्थिती लक्षणीय होती.या ठिकाणी भाजपा उमेदवार स्वेता सूर्यकांत धरणे उबाठाची उमेदवार सुनंदा धरणे यांच्या त लढत होतं आहे

​मणेरी गट: मणेरीमध्येही महायुतीचे उमेदवार साक्षी तळवडेकर आणि अपक्ष सुनीता भिसे यांच्यातच मुख्य लढत असल्याचे चित्र होते.

​प
​निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मण कसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात एकूण ५९ टक्के मतदान झाले आहे. मतदान केंद्राबाहेर सकाळपासूनच मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वृद्ध आणि दिव्यांग मतदारांनाही केंद्रापर्यंत आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी व नातेवाईकांनी मदत केली.

​तालुक्यातील सर्वच केंद्रांवर विविध पक्षांचे आणि अपक्ष उमेदवारांचे बूथ लक्ष वेधून घेत होते. उमेदवार स्वतः केंद्रांना भेटी देऊन मतदानाचा आढावा घेत होते. आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले असून दोडामार्गचा कौल कोणाच्या बाजूने लागणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.