दोडामार्ग येथील ज्येष्ठ व्यावसायिक एकनाथ भोसले यांचे निधन

दोडामार्ग: प्रतिनिधी 

येथील प्रसिद्ध महाराजा सभागृहाचे मालक आणि ज्येष्ठ व्यावसायिक श्री. एकनाथ शंकर भोसले (वय ७८) यांचे आज सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने दोडामार्ग परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

एक प्रदीर्घ व्यावसायिक म्हणून तालुक्यात त्याचा प्रवास झाला आहे

एकनाथ भोसले यांनी दोडामार्ग बाजारपेठेत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी अनेक वर्षे ‘महाराजा हॉटेल’ आणि ‘आईस्क्रीम फॅक्टरी’ अत्यंत यशस्वीपणे चालवली. सध्या त्यांच्या मालकीचे ‘हेमावती शंकर सभागृह’ (महाराजा सभागृह) हे शहरातील एक प्रमुख केंद्र आहे. आपल्या शांत आणि संयमी स्वभावामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क होता.

 

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण दोडामार्ग शहरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.