आमदार किरण सामंत यांच्याकडून शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई यांचा सत्कार

लांजा (प्रतिनिधी) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आल्याबद्दल आमदार किरण सामंत यांनी शिवसेना तालुकाप्रमुख असलेल्या गुरुप्रसाद देसाई यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
शिवसेनेचे लांजा तालुका प्रमुख म्हणून काम करत असताना गुरुप्रसाद देसाई यांनी पक्ष संघटना वाढीवर भर दिला आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून कशा पद्धतीने येतील यासाठी त्यांनी आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली मेहनत घेतली होती.
आज गुरुवारी निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले आहेत.‌ यावेळी आमदार किरण सामंत यांनी या विजयाबद्दल तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी शिवसेना पदाधिकारी सुनील कुरूप, रांजण नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर, उद्योजक भाई कामत, कॉन्ट्रॅक्टर संजय तेंडुलकर, शिवसेनेचे प्रचार प्रमुख प्रसन्न शेट्ये, आयडीसी बँक संचालक महेश मुन्ना खामकर, प्रसाद भाईशेट्ये, माजी नगरसेवक लल्ल्या कुरूप आधी उपस्थित होते.