वेंगुर्ले तालुक्यात जि. प. दोन आणि पं.स. च्या नऊ जागांवर महायुतीचा विजय…

पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले तालुक्यात जिल्हा परिषद पाच आणि पंचायत समितीच्या दहा जागांच्या निवडणुकीत महायुतीने मोठे यश प्राप्त केले आहे. पाच जिल्हा परिषद पैकी दोन जागा महायुतीने जिंकल्या आहेत. तर दोन उबाठा व एका जागेवर अपक्षाने बाजी मारली. तर दहा पंचायत समिती पैकी आसोली एक जागा महायुतीने बिनविरोध निवडून आणली होती. उर्वरित नऊ जागांपैकी आठ ठिकाणी महायुतीने विजय प्राप्त केला व एक जागा अपक्षाने मिळविली आहे. उबाठा आणि शरद पवार राष्ट्रवादीला पंचायत समितीमध्ये खातेही खोलता आले नाही. एकूणच महायुती च्या यशामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला आहे.
वेंगुर्ले तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार ओतारी यांच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ झाला. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने परिसरात उपस्थित होते.
जिल्हापरिषद म्हापण
एकूण मतदान – १२२७७ झालेले मतदान – ८५७९
मताधिक्य – २२
यज्ञा साळगावकर : विजयी
यज्ञा साळगावकर ३७५६
वंदना किनळेकर ३७३४
प्रतीक्षा पाटकर ९२२
नोटा : १८१

म्हापण पंचायत समिती
विष्णू उर्फ आपी फणसेकर विजयी
झालेले मतदान – ४०१५ मताधिक्य – १६६

विष्णू फणसेकर – १७१४ (विजयी) – भाजप

निकीत राऊळ – १५४८ – अपक्ष

अशोक पाटकर – ६७५ – उबाठा

नोटा – ९२

परूळे पंचायत समिती
सचिन देसाई विजयी

झालेले मतदान – ४०६४ मताधिक्य – १३१

सचिन देसाई – २१८४ (विजयी) – शिंदेसेना

निलेश सामंत – २०५३ – भाजप

वासुदेव माधव – २१९ – उबाठा

संकेत केळुस्कर ४७ – अपक्ष

नोटा – ६६

 

आडेली जिल्हापरिषद मतदार संघ
विजय नाईक – विजयी

एकूण मतदान – १२३०४
झालेले मतदान – ९०२१
मताधिक्य – ३८६

विजय नाईक – ४५०० (विजयी) – उबाठा

समिधा नाईक – ४११४ – महायुती पुरस्कृत अपक्ष

सखाराम सारंग – १२३७ – शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस

नोटा – १८८

आडेली पंचायत समिती
नितीन मांजरेकर : विजयी

झालेले मतदान – ४७४६ मताधिक्य – २२१

नितीन मांजरेकर – १८३२ (विजयी) – महायुती पुरस्कृत अपक्ष

जनार्दन उर्फ समीर कुडाळकर – १६११ – अपक्ष

नित्यानंद शेणई – १२१६ – उबाठा

नोटा – ९३

वायंगणी पंचायत समिती
शितल राऊत : विजयी
झालेले मतदान – ४२७५ मताधिक्य – ६७०

शितल बाबू राऊत – २३८४ (विजयी) – भाजप

रूतिका माडकर – १७१४ – उबाठा

नोटा – १७९

 

तुळस जिल्हापरिषद मतदार संघ
सुजाता पडवळ : विजयी
एकूण मतदान – ११७४१ झालेले मतदान – ७९३५
मताधिक्य – ६७३

सुजाता पडवळ – ३७०० (विजयी) – अपक्ष

योगिता परब – ३०२७ – शिंदेसेना

पल्लवी आरमारकर – १०९४ – उबाठा

नोटा – १३०

तुळस पंचायत समिती
सुचिता वजराठकर : विजयी
झालेले मतदान – ४०३७ मताधिक्य – ६०६

सुचिता वजराठकर – २०५६ (विजयी) – शिंदेसेना

अमृता साळगांवकर – १४५० (अपक्ष)

नयना धुरी – ३९८ (अपक्ष)

नोटा – १४२

मातोंड पंचायत समिती
शंकर घारे : विजयी
झालेले मतदान – ३८९८ मताधिक्य – २०१

शंकर घारे – १५८८ (विजयी) – भाजप

विजय रेडकर – १३८७ (अपक्ष)

रमाकांत कोंडये – ७४३ उबाठा

विशाल बागायतकर – ९७ – शरद पवार राष्ट्रवादी

नोटा – ९०

 

उभादांडा जिल्हापरिषद मतदार संघ
संजय गावडे ; विजयी
एकूण मतदान – ११२३७ झालेले मतदान – ७३०८
मताधिक्य – १४६१

संजय गावडे – ४३२२ (विजयी) उबाठा

मनवेल फर्नांडीस – २८६१ – भाजप

नोटा – १३३

उभादांडा पंचायत समिती
साक्षी नार्वेकर : विजयी
झालेले मतदान – ३६४० मताधिक्य – ८८७

साक्षी नार्वेकर – २१८८ (विजयी) – शिंदेसेना

गंधाली तांडेल – १३०१ उबाठा

नोटा – १५७

आसोली पंचायत समिती
येथे संकेत कुडव भाजप हे (बिनविरोध) निवडून आले आहेत.

रेडी जिल्हापरिषद मतदारसंघ
प्रितेश राऊळ : विजयी
एकूण मतदान – ११२२६ झालेले मतदान – ७७३६
मताधिक्य – ६३०

प्रितेश राऊळ – ३३४४ (विजयी) – भाजप

किरण पालयेकर – २७१४ – अपक्ष

नामेदव राणे – १४०५ – उबाठा

काशिनाथ नार्वेकर- ५९ – अपक्ष

चंद्रहास पांडजी -८४ – अपक्ष

नोटा – १४४

रेडी पंचायत समिती
प्रियांका घाटवळ : विजयी
झालेले मतदान – ४२९४ मताधिक्य – ८९७

प्रियांका घाटवळ – २४५६ (विजयी) – भाजप

वंदना कांबळी – १५५९ – उबाठा

नोटा – २८७

शिरोडा पंचायत समिती
योगिता परब-मसुरकर : विजयी
झालेले मतदान – ३४४२ मताधिक्य – ९०

योगिता परब – मसुरकर – १२४२ (विजयी) – अपक्ष

शितल साळगांवकर – ११३२ – शिंदेसेना

समृद्धी कुडव- ९०० -उभाठा

नोटा – ०