तळवली पंचायत समिती गणातून भाजपचे मंगेश जोशी यांचा विजय

गुहागर प्रतिनिधी
तळवली पंचायत समिती गणातून भाजपचे मंगेश जोशी यांनी विजय मिळवून या पंचायत समिती गणावर युतीच्या माध्यमातून भाजपाचा झेंडा फडकवला आहे.
तळवली पंचायत समिती गणातून युतीकडून भाजपने माजी आम. डॉ. विनय नातू यांचे विश्वासू सहकारी कारुळचे माजी सरपंच मंगेश जोशी यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. त्यांच्यासमोर उबाठाचे संदीप धनावडे हे निवडणूक रिंगणात होते.मात्र मंगेश जोशी यांनी डॉ.नातू यांच्या मार्गदर्शनाखाली विजय संपादन करून तळवली पंचायत समिती गणात भाजपचे वर्चस्व निर्माण केले आहे.जनतेने दाखवलेला विश्वास व जनतेशी जुळलेली नाळ यामुळे मंगेश जोशी यांनी याठिकाणी विजय संपादन केला. मंगेश जोशी यांच्या विजयाने येथील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.