भुदरगडावर महायुतीची हवा….

पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीवर भगवा झेंडा…

प्रतिनिधी /रोहन कांबळे

कोल्हापूर:पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत सत्ता खेचून आणत एक हाती सत्ता मिळवली.या निवडणुकीत त्यांना भाजपची महत्वाची साथ मिळाली.या निवडणुकीत भुदरगड तालुक्यातील तीन मतदारसंघात भरघोस मते मिळवून विजय मिळवला.आणि पुन्हा एकदा शिवसेनेने भुदरगड पंचायत समितीवर वर्चस्व सिद्ध केले.

मात्र तालुक्यातील गारगोटी जिल्हा परिषद मतदार संघवार काँग्रेसच्या विद्यमान सदस्य रेश्मा देसाई यांनी विजय मिळवून पुन्हा एकदा काँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित राखला.

कडगाव जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेनेचे पंचायत समितीचे माजी उपसभापती बाबा नांदेकर यांच्या सौभाग्यवती सारिका नांदेकर यांचा विजय झाला.तर आकुर्डे कुर जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेनेचा नवीन चेहरा असलेला अर्चना निकम यांना मतदारांनी पसंती दिली.त्यांना तब्बल ४६७७ इतक्या मतांनी त्या विजयी झाल्या.

पिंपळगाव जिल्हा परिषद मतदार संघात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या भावजय व प्रा.अर्जुन आबिटकर यांच्या सौभाग्यवती रोहिणी आबिटकर यांनी विजय मिळवला. प्रा.अर्जुन आबिटकर यांनी याआधी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले होते.त्यांनी केलेल्या विकास कामांची पोहोचपावती जनतेने मतदानाच्या स्वरूपात दिली.

या निवडणुकीत आमदार सतेज पाटील,माजी आमदार के.पी.पाटील, माजी आमदार बजरंग देसाई यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस – राष्ट्रवादी प्रणित शिव शाहू आघाडी मातब्बर जागेवर आपले उमेदवार उभे केले होते.यामुळे महायुती विरूद्ध शिव शाहू आघाडी यांच्यात दूरंगी लढत झाली.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वामुळे विजय खेचून आणण्यात यश आले