गौरव पोंक्षे | माखजन :
संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथील हेमाडपंथी बांधणीच्या श्री आमनायेश्वर मंदिरात १२ फेब्रुवारी पासून महाशिवरात्री उत्सवाला प्रारंभ होत आहे.
यामध्ये १२ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमानी उत्सव साजरा करण्यात येत आहे.यामध्ये सकाळी रुद्रभिषेक व पूजा होईल.१२,१३,१४ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता श्रीकांत फाटक यांचे कीर्तन होणार आहे.
१५ रोजी महाशिवरात्री दिनी मंदिर परिसरात दरवर्षी प्रमाणे जत्रा भरणार आहे. पालखी सजावंट ,दीपमाळ प्रज्वलन,रात्री १०.३०/वाजता पाळखी सोहळा,व नन्तर कीर्तन होईल.
१६ रोजी रात्री १० वाजता तीर्थप्रसादाचे कीर्तन होईल.१७ रोजी आमनायेश्वर प्रासादिक नाट्य मंडळ पुरस्कृत समर्थ कृपा प्रोडक्शन्स रत्नागिरी प्रस्तुत म्युझिकल दुनियादारी हा हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. विविध कार्यक्रमाना उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष संजय सहस्त्रबुद्धे व सचिव समीर शिंदे व मंडळातर्फे करण्यात आले आहे.











