सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल वेळणेश्वरच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्तरावर यश…

गुहागर प्रतिनिधी:
जयपूर येथे झालेल्या पंधराव्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सरस्वती इंग्लिश मिडीयम स्कूल वेळणेश्वर येथील 8 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. जयपूर (राजस्थान) येथे या शाळेच्या विद्यार्थ्यांनी कराटे व ॲथलेटिक्स (धावणे) खेळात आपले प्राविण्य प्रदर्शित करून राष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे.
या खेळाडूनी संपूर्ण भारतभर आपल्या कौशल्यांचे प्रदर्शन केले.श्रव्य महेश अडूरकर (ॲथलेटिक्स आणि कराटे) या दोन्ही इव्हेंट मध्ये सुवर्ण पदक, मायरा प्रावीण्य जागकर (कराटे) सुवर्ण पदक, स्मरणिका प्रितम नाटेकर (कराटे) सुवर्ण पदक, शिवांश दिलीप जाक्कर (ॲथलेटिक्स) रौप्य पदक, अवनी नरेश अडूरकर (कराटे ) रौप्य पदक, शिवांश सुशेश अडूरकर (कराटे) रौप्य पदक, श्रोन मंदार पालशेतकर (कराटे) रौप्य पदक आणि प्रांश गणेश वेलणकर (कराटे) कास्य पदक. हेड ऑफ स्कूल तसेच कोच फस्ट डॅन ब्लॅक बेल्ट रूपाली पालशेतकर तसेच शिक्षिका तेजस्वी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करून अतिशय मेहनतीने हे यश संपादन केले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल मुलांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या या यशामागे पालकांचे प्रोत्साहन तसेच प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
या घवघवीत यशामुळे शाळेचे तसेच गुहागर तालुक्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल झाले असून या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षक यांचे देखील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.