सावंतवाडीत ‘ज्ञानसेवा स्कॉलर अकॅडमी’चे थाटात उद्घाटन

 

सावंतवाडी:सावंतवाडीतील ‘ज्ञानसेवा स्कॉलर अकॅडमी’ ही केवळ एक शैक्षणिक संस्था नसून, डॉक्टर, इंजिनिअर आणि वैज्ञानिक घडविणारा हा एक उत्तम कारखाना आहे, असे गौरवौद्गार सावंतवाडी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष श्री. अनिरुद्ध निरवडेकर यांनी काढले. सावंतवाडी येथील ज्ञानसेवा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या भव्य उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले आणि त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी कळसूली हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. रामचंद्र परब, नेमळे हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका सौ. साधना तेंडुलकर, रेडी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. चंद्रशेखर जाधव सर, संस्थेचे अध्यक्ष श्री. अभय जाधव सर, डॉ. नारायण नाईक, संचालिका अनविता जाधव आणि कादंबरी म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष श्री. समीर जाधव, समीर परब, ऋतुजा परब आणि दोडामार्ग पंचायत समितीचे श्री. गावकर यांनीही उपस्थित राहून संस्थेच्या या नवीन उपक्रमाचे कौतुक केले. मार्गदर्शनापर भाषणात श्री. चंद्रशेखर जाधव यांनी संस्थेच्या शैक्षणिक कार्याची प्रशंसा करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्याला स्मिता जाधव, माया जाधव, रश्मी आजगावकर, भारती गावकर, सपना चव्हाण, सौम्या जाधव, स्वार मेडिकलचे संचालक वामन स्वार, जुवेरिया शेख, कमतनुरे, रुची संत्रा, माणगाव हायस्कूलच्या शिक्षिका खाडिलकर मॅडम, दशरथ गौडेकर, सान्वी जाधव, प्रियल जाधव, निशा चव्हाण, भक्ती गावकर, मानसी डोंगरे, गायत्री डोंगरे आणि मधुरेश राणे यांसह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन श्री. प्रा. संजोग जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. अशोक जाधव व अश्विनी जाधव यांनी मानले.