कै.गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय, त्रिंबकच्या वतीने खुली वक्तृत्व स्पर्धा

वाचन कलाविकास समिती त्रिंबक संचलित कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय, त्रिंबक ,तालुका मालवण यांनी कै.दादा ठाकूर (आचरे- पारवाडी ) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सिंधुदूर्ग जिल्हास्तरीय खुल्या

(प्रौढ गट) वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलेले असून या स्पर्धा शनिवार दिनांक २१ मार्च २०२६ रोजी सकाळी ०९-३० वाजता जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेच्या सभागृहात घेण्यात येणार आहेत.

*स्पर्धेचे विषय*

१) व्यक्तिमत्व विकासात

ग्रंथालयांचे स्थान.

२) मोबाईल ! आदर्श समाज

जीवनाचे वरदान की

शाप ?

३). ग्रामीण भागातील

युवांच्या विवाहसमस्या

आणि उपाययोजना.

वरीलपैकी कोणताही एक विषय स्पर्धकाने निवडावयाचा आहे. सादरीकरण करण्याची वेळ किमान ६ मिनिट तर कमाल ८ मिनिटे आहे.

१ जानेवारी २०२६ पूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेला सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कोणताही स्पर्धक स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे

प्रथम क्रमांक – रू.२०००/-,

स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.

द्वितीय क्रमांक -रू. १५००/- ,

स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.

तृतीय क्रमांक- रू.१०००/- ,

स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.

उत्तेजनार्थ. – रु. ५००/-,

स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.

असे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. प्रथम प्रवेश पत्रिका आलेल्या १५ स्पर्धकांनाच स्पर्धेत प्रवेश दिला जाणार आहे. स्पर्धकांनी आपली नावे सहाय्यक ग्रंथपाल श्री. विवेक जाधव.मोबाईल नंबर-

९४२०७६३०१९ (व्हॉट.), ९०४९१२०६१० यांचे जवळ *१४ मार्च २०२६ पर्यंत* दयावीत, पण १५ स्पर्धक झाले की नोंदणी बंद केली जाईल.

सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी अध्यक्ष- श्री सुरेंद्र सिताराम सकपाळ , मोबाईल नंबर- .९४२३३०१५८४, यांच्याशी संपर्क साधावा. त्यानंतर आपल्याला प्रवेश अर्ज व्हाट्सअप क्रमांकावर पाठविण्यात येईल तो भरून वेळेत पाठवावा. अशी माहिती संस्थेचे सेक्रेटरी श्री. प्रशांत मेहेंदळे यांनी दिली.