रत्नागिरी:
रत्नागिरी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीनंतर रत्नागिरी नगर परिषदे अंतर्गत येणाऱ्या विविध समित्यांची देखील निर्मिती करण्यात आली आहे. नुकतीच वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करण्यात आली. रनप मुख्याधिकारी हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असून तर समितीमध्ये अभ्यासू आणि तद्न्य व्यक्ती म्हणून मोहिंदर उर्फ राजा बामणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहरी भागातील झाडांचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी नगर परिषद हद्दीत वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करण्यात येते.महाराष्ट्र (नागरिक्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 चे कलम 3 (1) अन्वये या समितीची निवड करण्यात आली आहे. रनपच्या वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये नगर परिषदेत नगरसेवक म्हणून निवडून आलेले चार नगरसेवक पदसिद्ध सदस्य यात. यामध्ये राजन शेट्ये, सौरभ मलुष्टे, रुकसार जकी खान, नितीन जाधव यांची निवड काण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांकरिता या वृक्ष प्राधिकरण समितीची निवड करण्यात आली आहे. रनपच्या वृक्ष प्राधिकरण समितीची निवड झाल्यानंतर नवनियुक्त सदस्यांचे नगरसेवक आणि अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले. येणाऱ्या पाच वर्षात शहरातील झाडांचे जतन करण्यासह नवीन झाडांच्या लागवडीवर अधिक भर राहील असा निर्धार नवनियुक्त सदस्यांनी व्यक्त केला.












