ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे बावळाट येथील युवक आणि सध्या डोंबिवली येथे वास्तव्यास असणाऱ्या कु.निषाद प्रकाश चिले वय 22 या युवकाचे मुंबई येथून बाहेर कार्यक्रमासाठी जात असताना गुरुवारी रात्री अपघाती निधन झाले. प्रसिद्ध संगीत भजनी बुवा गुरुमाऊली प्रकाश चिले (बुवा ) यांचा तो सुपुत्र त्यांच्या जाण्याने चिले कुटुंबियांवार दुःखाचा डोंगर कोसळला आहे.भजनी बुवा प्रकाश चिले यांनी आपलं संपूर्ण आयुष्य भजन कला जो पासण्यासाठी खर्ची घातलं आणि त्यांचे सुपुत्र हा संगीत कलेचा वारसा जोपासत होते.वडिलांची गायन वादन कला या बरोबर निषाद हा कार्यक्रमात तबला वादनही करायचा अशाच एका संगीत कार्यक्रमासाठी तो ट्रेन ने जात असताना ट्रेन मधून पडून त्याचा मृत्यू झाला.निषाद हा 36 प्रकारची वाद्ये वाजवायचा अल्पवधित त्यांनी संगीत क्षेत्रात नाव लौकिक मिळवीला होता काही दिवसापूर्वी प्रकाश चिले हेही आजारी होते यातून नुकतेच ते सावरत असताना मुलाच्या अकाली जाण्याने चिले बुवा पूर्णतः खचून गेले आहेत.अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटून त्यांचे सांतवन केले. त्याची अंत्ययात्रा त्यांच्या मुंबई येथील निलकंठ अपार्टमेंट, जोंधळे स्कूल च्या बाजूला डोंबिवली (प.) येथून निघणार आहे. त्याच्या पच्छात मोठी बहीण, वडील, आई, आजी आजोबा, काकी असा मोठा परिवार आहे.












