दापोलीत दिवसाढवळ्या चोरी: कोळथरे येथील मंदिरांतील पितळी घंटांसह कॅमेरा लांबवला

रत्नागिरी ः प्रतिनिधी
दापोली तालुक्यातील कोळथरे येथील चंडिकादेवी व कालिका देवी मंदिरातील तीन पितळी घंटा आणि एक कॅमेरा असा एकूण 96 हजारांचा मुद्देमाल अज्ञाताने लांबवला. चोरीही ही घटना बुधवार 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.45 वा.कालावधीत घडली आहे.
याबाबत सुभाष भिकाजी घुबडे (46,रा.चंडिकानगर गोमराई कोळथरे,दापोली) यांनी दाभोळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताने बुधवारी सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.45 वा.कालावधीत या दोन्ही मंदिरांमधील 40 हजारांची 20 किलो वजनाची पितळी घंटा,30 हजारांची 15 किलो वजनाची पितळी घंटा आणि 20 हजारांची 10 किलो वजनाची पितळी घंटा तसेच 6 हजारांचा कॅमेरा असा एकूण 96 हजारांचा मुद्देमाल लांबवला. याप्रकरणी अधिक तपास दाभोळ पोलिस करत आहेत.