शृंगारतळी (वार्ताहर) :गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे गावडेवाडी येथील श्री शिवदेव बेलवृक्ष मंदिरात १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र उत्सव आणि श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या महाशिवरात्र उत्सवानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त स. ७ वा. अभिषेक, दु. ११ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, सकाळी ११. ३० वाजता चित्रकला स्पर्धा, दु. ३ वा. हळदीकुंकू, संध्या. ४ वा. इतर स्पर्धा, संध्या. ६ वा. महाआरती, संध्या. ७ ते ९ महाप्रसाद , रात्री ९ वा. मान्यवर व विद्यार्थी सत्कार समारंभ, रात्री १० वा. कोकणचे झांजगी नमन त्रिमूर्ती नाट्य नमन मंडळ चिपळूण कला आमची साथ तुमची असे कार्यक्रम होणार आहेत.
तसेच महाशिवरात्री निमित्त डोळे तपासणी रक्तातील साखर मधुमेह (डायबिटीज) तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत पार पडणार आहे तरी या शिबिराचा अवश्य फायदा घ्यावा. तसेच भाविकांनी दर्शनाचा आणि कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री शिवदेव बेलवृक्ष उत्कर्ष मंडळ व महिला मंडळ पाटपन्हाळे गावडेवाडीतर्फे करण्यात आले आहे.












