स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण ‘ऑन ड्युटी 24 तास’
नागरिकांसोबत संवाद साधून समस्यांवर तात्काळ उपाययोजना
मोरेश्वरवाडी येथे कचरा व गाळाने भरलेल्या नाल्याची ही केली पाहाणी
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहर स्वच्छतेचा संकल्प करून स्वच्छता व आरोग्य सभापती ऑन ड्युटी 24 तास कार्यरत दिसून येत आहेत. शुक्रवारी धुरीवाडा येथे साचलेल्या कचरा आणि सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर शनिवारी सकाळी मोरेश्वरवाडी येथे भेट देवून कचरा व गाळाने भरलेल्या नाल्याची केली पाहाणी केली.
स्थानिक नगरसेवक यांना विश्वासात घेऊन तसेच स्थानिक रहिवासी याच्याशी संवाद साधला. गाळाने व कचऱ्याने भरलेला नाला गाळ व कचरा मुक्त करण्याच्या दृष्टीने चर्चा केली. तसेच उपाययोजना करण्याबाबत प्रशासनास सूचना दिल्या.
आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतील एकवीसव्या शतकातील आदर्श असे पर्यटन शहर बनवणे यासाठी माझे संपूर्ण योगदान देण्याचा प्रयत्न राहणार आहे असे स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी स्पष्ट केले.
जनतेचे प्रश्न खऱ्या अर्थाने सुटले पाहिजे, त्यांना वारंवार समस्या सोडवण्यासाठी मागणी करण्याची गरज लागता नये. नागरिकांना पायाभूत सेवा सुविधा पुरवणे ही नगर परिषदेची जबाबदारी आहे. त्या दृष्टीने शहरातील सर्व भागात प्रत्यक्ष भेटी देऊन नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणे तसेच आवश्यक त्या उपाययोजना नगर परिषदेच्या माध्यमातून करणे यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे सभापती पूनम चव्हाण यांनी सांगितले आहे. सभापती पूनम चव्हाण यांच्या तत्पर कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.











