लांजा (प्रतिनिधी) शहरातील नुतन युवक मंडळ शेट्येवाडी यांच्या वतीने २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता श्री पौलस्तेश्वर जुगाई देवी मंदिर, शेट्येवाडी येथे भव्य ढोलवादन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या पथकाला रोख १०,५५५ रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे, तर द्वितीय क्रमांकासाठी ७,५५५ रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट वेशभूषा, सर्वोत्कृष्ट ढोलवादक, सर्वोत्कृष्ट झांजवादक, सर्वोत्कृष्ट ताशावादक आणि सर्वोत्कृष्ट निशाणधारक असे विविध सन्मानचिन्ह देऊन उत्कृष्ट कलाकारांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व पथकांनाही सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
विशेष बाब म्हणजे या स्पर्धेत लांजा तालुक्यातील सहभागी पथकांना आयोजकांच्या वतीने १,००० रुपये गाडी खर्च देण्यात येणार असून तालुक्याबाहेरील पथकांना १,५०० रुपये गाडी खर्च देऊन प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यामुळे तालुक्यासह परिसरातील अधिकाधिक ढोल-ताशा पथकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी श्रीनिवास शेट्ये (९९७०८४१२९७), राहुल शेट्ये (८३९०२६९६९६), अनिकेत शेट्ये (८०८०१६७९४०), गणेश शेट्ये (७३८७८५४६९९) व अक्षय शेट्ये (८०५५८२५९५९) यांच्याशी संपर्क साधावा.












