गौरव पोंक्षे | माखजन
संगमेश्वर तालुक्यातील सुप्रसिद्ध असलेल्या जागृत अशा मावळंगे गावच्या मानोबाची यात्रा २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
फाल्गुन पौर्णिमेला कोकणात मोठ्या जल्लोषात,होळी हा सण साजरा केला जातो.फाल्गुन पौर्णिमेच्या दोन दिवस आधी मावळंगे येथील श्री देव मानोबाची यात्रा होते.जागृत आणि हाकेला धावणारा अशी ख्याती असलेल्या मानोबाच्या यात्रेसाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर शहरांमधून देखील भाविक उपस्थित असतात.
अनेक भाविक विविध कारणांसाठी नवस बोलतात..व नवस फेडण्यासाठी देखील उपस्थित असतात.मावळंगे गाव जरी छोटा असला तरी मानोबाच्या यात्रेमुळे गाव भाविकांच्या गर्दीने फुलून जातो.
२८ फेब्रुवारी दुपारी ३ ते रात्री १२ पर्यंत ही यात्रा चालणार आहे.यावेळी होणाऱ्या महाप्रसादाला भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मावळंगे ग्रामस्थ व मुंबई मंडळाने केले आहे.













