बांदा रोटरॅक्ट क्लबच्या शिबीरात ७४ रुग्णांची रक्त तपासणी

बांदा (प्रतिनिधी) :     रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदातर्फे मोफत रक्त तपासणी शिबीर यशस्वीपणे राबविण्यात आले. या शिबीरात तब्बल ७४ जणांची रक्त तपासणी करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ बांदाचे अध्यक्ष प्रमोद कामत, सचिव नरसिंह काणेकर, माजी अध्यक्ष मंदार कल्याणकर, रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष  अक्षय मयेकर, सचिव अवधूत चिंदरकर, हिंद लॅबच्या श्वेता वराडकर आदी उपस्थित होते. यावेळी प्रसूती रुग्णांना फळवाटप करण्यात आले.
रोटरी क्लब व रोटरॅक्ट क्लब नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत. हा वसा यापुढेही राबविला जाईल असे मत अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी व्यक्त केले.
रोटरॅक्ट क्लब जोमाने काम करत असून त्यांना यंदा बेस्ट चार्टर क्लब अवॉर्ड प्राप्त झाला. याचा आम्हाला अभिमान आहे असे मत रोटरी अध्यक्ष प्रमोद कामत यांनी व्यक्त केले.
यावेळी रोटरॅक्ट क्लबचे मिताली सावंत, अवधूत चिंदरकर, रोहन कुबडे, विनिता कुबडे, मुईन खान, शिवम गावडे,  दत्तराज चिंदरकर, संकेत वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते